ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मैदा आणि जास्तीत गोड पदार्थ आहारात असल्याने त्या व्यक्तीला दाढदुखीच्या समस्यांचा सामना करावा लागतो.
दाढ दुखणे सुरू झाल्यास दातावर जोरात ठणके बसतात, काय करावे आणि काय नाही काहीच सुचत नाही.
दात खोलवर खराब झाला असेल तर कान, डोकं आणि डोळे देखील दुखतात.
दात दुखीवर उपाय म्हणून कोमट पाण्यात मिठ मिक्स करा आणि त्याच्या गुळण्या करा.
दाद जास्त ठणकत असेल तर लवंग त्यावर फार उपयुक्त आहे.
लवंग किंवा लवंगचे तेल कापसात बुडवून तो कापूस ज्या दाताला खड्डा आहे तेथे ठेवा.
बेकींग सोडा देखील यावर फायदेशीर आहे. तुम्ही बेकींग सोड्याने दात घासू शकता.
असे काही घरगुती उपाय केल्याने तुमचा दात दुखणे काही काळासाठी बंद होईल. जास्त त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.