Colours Of Tongue : जीभेचा रंग बदलला असेल तर सावध व्हा! शरीर देतेय 'या' गंभीर आजारांचे संकेत

Shreya Maskar

जिभेचा रंग

आपल्या शरीरातील अनेक बदलांचे संकेत तोंड आणि जिभेमध्ये दिसू शकतात. जिभेचा रंग गुलाबी, पांढरा, लाल, पिवळसर, निळसर किंवा काळपट असतो.

Color of the tongue | pinterest

गुलाबी जीभ

गुलाबी जीभ म्हणजे निरोगी आरोग्याचे लक्षण होय. तिच्यावर लहान उंचवटे दिसतात, जे चव ओळखण्यास मदत करतात. जिभेवर पातळ पांढरट थर असणेही सामान्य असू शकते.

Pink tongue | pinterest

पांढरी जीभ

पांढरी जीभ बुरशीजन्य संसर्ग, तोंडाच्या स्वच्छतेची समस्या दर्शवते. जिभेवर पांढरा थर जमा होण्यामागे अन्नाचे कण, मृत पेशी, तोंडातील जिवाणू किंवा तोंड कोरडे पडणे ही कारणे असू शकतात.

White tongue | pinterest

लाल जीभ

जीवनसत्त्वांची कमतरता आणि दाह होत असेल तर जीभ लाल रंगाची दिसते. जीभ नेहमीपेक्षा अधिक लाल, गुळगुळीत किंवा दुखरी दिसत असल्यास जिभेला आलेली सूज, व्हिटॅमिन बी१२, फोलेटची कमतरता यांसारखी कारणे असू शकतात.

red tongue | pinterest

पिवळसर जीभ

जिवाणूंचा थर, तोंड कोरडे पडले असेल तर पिवळसर जीभ होते. जीभ पिवळसर दिसण्यासोबत डोळ्यांचा पांढरा भाग आणि त्वचाही पिवळी पडत असल्यास कावीळ किंवा यकृताशी संबंधित समस्या असू शकते.

Yellow tongue | pinterest

काळपट जीभ

जिभेवरील लहान उंचवटे लांब होऊन त्यावर मृत पेशी, जिवाणू आणि रंगद्रव्ये जमा झाल्याने जीभ काळपट दिसू शकते. या स्थितीला ब्लॅक हेअरी टंग म्हणतात. तोंडाची अपुरी स्वच्छता, तंबाखूचे सेवन आणि काही औषधे यामुळे होते.

Black tongue | pinterest

निळसर किंवा जांभळट जीभ

रक्ताभिसरण,ऑक्सिजनची समस्या असल्यास जीभेचा रंग निळसर किंवा जांभळट होतो. जीभ अचानक निळसर पडल्यास, विशेषतः श्वास घेण्यास त्रास, छातीत दुखणे या समस्या उद्भवतात.

Bluish or purple tongue | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : फिट आल्यावर लगेच करा 'हे' काम, वाचू शकतो रुग्णाचा जीव

Epilepsy | AI PHOTO
येथे क्लिक करा...