Epilepsy : फिट आल्यावर लगेच करा 'हे' काम, वाचू शकतो रुग्णाचा जीव

Shreya Maskar

एपिलेप्सी

एपिलेप्सी ज्याला 'अपस्मार', 'मिरगी', 'फिट्सचा आजार' असेही म्हणतात. हा मेंदूचा एक दीर्घकालीन (क्रोनिक) न्यूरोलॉजिकल विकार आहे.

Epilepsy | pinterest

मेंदूतील बिघाड

आपल्या मेंदूतील मज्जातंतू पेशी विचारांची आणि हालचालींची देवाणघेवाण करण्यासाठी विजेचे संदेश तयार करतात. एपिलेप्सीमध्ये, मेंदूतील या विद्युत आणि रासायनिक क्रियांमध्ये अचानक आणि असामान्य बदल होतो.

Brain damage | pinterest

वारंवार झटके

जेव्हा हे असामान्य विद्युत सिग्नल वारंवार आणि विनाकारण तयार होतात, तेव्हा व्यक्तीला झटके किंवा फेफरे (Seizures) येतात.

Frequent seizures | pinterest

अपस्मार-फिट्समधील फरक

प्रत्येक वेळी फिट येणे म्हणजे एपिलेप्सी नसते, परंतु वारंवार फिट्स येतात, तेव्हा त्या स्थितीला एपिलेप्सी म्हटले जाते.

Differences in epileptic-fits | pinterest

उपाय

फिट आल्यावर घाबरून न जाता रुग्णाजवळ थांबा. रुग्णाच्या डोक्याखाली मऊ ऊशी ठेवे, जेणेकरून दुखापत होऊ नये. तातडीने वैद्यकीय मदत घ्या. आजूबाजूच्या धोकादायक वस्तू बाजूला ठेवा.

Solution | pinterest

श्वास तपासा

व्यक्ती बेशुद्ध किंवा पूर्णपणे शुद्धीवर नसल्यास, हालचाली थांबल्यानंतर तिला हळूच कुशीवर वळवा आणि श्वास तपासा.

Check breathing | pinterest

काय करू नये?

रुग्णाला जबरदस्तीने पकडून ठेवू नका. तोंडात चमचा, बोट, पाणी, औषध किंवा इतर कोणतीही वस्तू घालू नका. पूर्ण शुद्धीवर येईपर्यंत खायला-प्यायला देऊ नका.

What not to do? | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : पनीर आवडते म्हणून जास्त खाताय? 'या' लोकांनी पनीर खाणे लगेच थांबवा, नाहीतर...

Paneer | AI PHOTO
येथे क्लिक करा...