Shreya Maskar
बदलत्या वातावरणात सर्दी-खोकला होत असेल तर टोमॅटो सूप प्या.
टोमॅटो सूप बनवण्यासाठी टोमॅटो, बटर, लसूण, आल्याचा तुकडा, काळी मिरी आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
टोमॅटो सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम टोमॅटो, लसूण आणि आल्याचे तुकडे करून घ्या.
पॅनमध्ये बटर टाकून टोमॅटो, लसूण, आले मंद आचेवर शिजू द्या.
आता टोमॅटोची साल काढून लसूण आणि आल्यासोबत पेस्ट वाटून घ्या.
तुम्ही यात गाजर, पालक या भाज्या देखील टाकू शकता.
तयार पेस्ट गाळून यात साखर, मीठ आणि मिरपूड टाकून मिक्स करा.
तुम्ही टोमॅटो सूपची चव वाढवण्यासाठी यात मक्याचे दाणे देखील टाकू शकता.