Shreya Maskar
पावसाळ्यात नाश्त्याला टोमॅटो रस्सम आवर्जून बनवा.
टोमॅटो रस्सम बनवण्यासाठी टोमॅटो प्युरी, चिंचेचा अर्क, मोहरी, काळी मिरी, लसूण , तेल, हळद पावडर , धने पावडर , कोथिंबीर, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या हिंग आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
टोमॅटो रस्सम बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तेल गरम करून त्यात हिंग, मोहरी टाका.
त्यानंतर यात टोमॅटो प्युरी, हळद आणि चवीनुसार मीठ टाकून शिजवून घ्या.
टोमॅटोचा कच्चेपणा निघून गेल्यावर त्यात पाणी, चिंचेचा अर्क मिक्स करा.
उकळलेल्या रस्सममध्ये लसूण, काळी मिरी आणि धने पावडर टाकून शिजवून घ्या.
आता टोमॅटो रस्समध्ये तूप आणि कोथिंबीर टाकून आस्वाद घ्या.
टोमॅटो रस्सममुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पचन सुधारते.