Shreya Maskar
हिवाळ्यात चेहऱ्याला मध आणि टोमॅटोचा फेसपॅक लावा. जेणेकरून ख्रिसमस पार्टीपर्यंत तुमचा चेहरा ग्लो करेल आणि तुम्ही सुंदर दिसाल.
मध आणि टोमॅटोचा फेसपॅक लावल्याने हिवाळ्यात तुम्हाला ग्लोइंग त्वचा मिळेल. हा फेसपॅक बनवायला अगदी सिंपल आहे. त्यामुळे आताच ट्राय करा.
एका बाऊलमध्ये टोमॅटो पेस्ट किंवा टोमॅटो प्युरी घ्या त्यात एक चमचा मध मिसळा. तयार मिश्रण ५ मिनिटे थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा.
चेहरा स्वच्छ करून तयार पेस्ट १५ ते २० मिनिटे त्यावर लावा. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या.
आठवड्यातून २ वेळा टोमॅटो फेसपॅक लावल्याने काळवंडलेली त्वचा चमकदार होते. तसेच त्वचा हायड्रेट राहते.
टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-फंगल गुणधर्म आढळतात. ज्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स, काळे डाग कमी होतात आणि चेहरा चमकू लागतो.
टोमॅटो आणि मध चेहऱ्याला मॉइश्चरायझ करते. त्यामुळे हिवाळ्यातील कोरडी त्वचा तजेलदार राहते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.