Shreya Maskar
टोमॅटो जास्त प्रमाणात बियांसोबत खाणे टाळा. तसेच टोमॅटोच्या बिया खाव्यात की नाही? हे प्रत्येकाच्या आरोग्यावर आणि पचनक्रियेवर अवलंबून असते.
टोमॅटोच्या बिया पचायला जड असतात. ज्यामुळे पोटदुखी किंवा अपचन होऊ शकते. त्यामुळे ज्यांना पचनाचा त्रास आहे, त्यांनी टोमॅटो बियांसोबत खाणे टाळा.
टोमॅटोच्या बिया खाल्ल्यामुळे पोटात गॅस किंवा ॲसिडीटीचा त्रास जाणवू शकतो. असे वारंवार होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टोमॅटोच्या बियांमुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो. त्यामुळे सहसा किडनीचा त्रास असलेल्या लोकांनी टोमॅटो बियांसोबत खाणे टाळा.
टोमॅटोच्या बियांमध्ये प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणत असतात. ज्यामुळे आरोग्य चांगले राहते आणि त्वचा हायड्रेट राहते.
टोमॅटोच्या बियांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य आणि त्वचेचे आरोग्य उत्तम राहते.
टोमॅटो खाताना सर्व साधारणपणे त्याच्या बिया काढून खाल्ला तर आरोग्याला कोणतेही नुकसान होणार नाही.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.