Shreya Maskar
अनेक महिलांना भात शिजवताना अडचणी येतात. त्यांचा भात कुकरच्या बाहेर येतो. तसेच तो पातळ होते. यावर सिंपल उपाय जाणून घेऊयात.
कुकरच्या भांड्यात तांदूळ टाकून त्यात पाणी भरा. तांदळचे भांडे भरेल इतके पाणी न टाकता अर्ध्याहून कमी पाणी भरा. जेणेकरून भात भांड्यांच्या बाहेर येणार नाही.
तांदळाच्या भांड्यात आपले अर्धे बोट बुडले जाईल इतकेच पाणी घाला. हे योग्य प्रमाण आहे. ज्यामुळे भात नीट शिजतो.
पाणी जास्त झाल्यामुळे अनेकदा भात कुकरच्या भांड्यांच्या बाहेर येतो. ज्यामुळे पदार्थ फसतो आणि कुकरचे भांडे खराब होते.
तसेच तुम्ही २-३ महिन्यानंतर प्रेशर कुकर तपासून घ्या. तसेच नियमित साफ करा. जेणेकरून भात बाहेर येणार नाही.
कुकरची शिट्टी गरम पाण्यात बुडवून १०-१५ मिनिटे ठेवा आणि स्वच्छ साफ करा.
प्रेशर कुकरमध्ये भात कायम मंद आचेवर शिजवा. म्हणजे भात बाहेर येणार नाही तसेच तो करपणार देखील नाही.
भात कुकरमध्ये शिजवताना त्यात तूप टाका. जेणेकरून तो मऊसूत होईल.