Chetan Bodke
'द फॅमिली मॅन' वेबसीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांमध्ये चर्चेत आलेल्या प्रियमणीच्या फॅशनची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
प्रियामणी नेहमीच इन्स्टाग्रामवर ॲक्टिव्ह असते, ती सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजात फोटोशूट करते.
नुकतंच शेअर केलेल्या फोटोंमध्ये प्रियामणीने हटके स्टाईलमध्ये आऊटफिट वेअर करून खूप सुंदर फोटोशूट केले आहे.
फोटोंमध्ये अभिनेत्रीने गोल्डन येलो कलरची पारंपारिक साडी वेअर करून अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केले.
प्रियामणीने पारंपारिक लूकला दिलेला आधुनिकतेचा साज नेटकऱ्यांना प्रचंड भावला असून तिच्या सौंदर्याचे कौतुक केले जात आहे.
अभिनेत्रीने या लूकला साजेसा मेकअप आणि दागिने परिधान करून खूप सुंदर फोटोशूट केलेले आहे.
प्रियामणीच्या सौंदर्याचे चाहत्यांकडून कौतुक होत असून तिचा साधेपणा चाहत्यांना भावला.
शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.
साऊथ इंडस्ट्रीसोबतच प्रियामणीने बॉलिवूडमध्येही डेब्यू केले असून तिच्या अभिनयाचा डंका ओटीटीवरही कायम आहे.