Chetan Bodke
संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या सौंदर्य आणि डान्सच्या माध्यमातून वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलने होळी दण्क्यात साजरी केली.
नुकतंच गौतमीने इन्स्टाग्रामवर होळी सेलिब्रेट करतानाचे फोटो शेअर केले आहेत.
गौतमीच्या होळीच्या फोटोंची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू असून तिच्या सौंदर्याची चर्चा होत आहे.
होळी सेलिब्रेशन करताना गौतमीने व्हाईट साडी आणि ब्लू कलरचा स्टायलिश ब्लाऊज करून हटके फोटोशूट तिने केलेले आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये गौतमीच्या गालाला कलर लावलेला दिसत असून ती त्यातही खूपच सुंदर दिसत आहे.
स्टायलिश अंदाजामध्ये कॅमेर्यामध्ये पोजेस कशा द्यायच्या हे गौतमीला चांगलचं माहित आहे.
गौतमीच्या ह्या होळी स्पेशल फोटोंना अवघ्या दोन तासांत हजारो लाईक्स मिळाले आहेत.
गौतमी एक प्रसिद्ध डान्सर असून तिच्या डान्सची चर्चा अवघ्या महाराष्ट्रामध्ये कायम होत असते.