Chetan Bodke
गेल्या काही दिवसांपूर्वी प्रशांत नील दिग्दर्शित ‘सालार पार्ट १: द सिझफायर’ चित्रपट रिलीज झाला. चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.
चित्रपटाप्रमाणेच त्यातील कलाकारही प्रचंड चर्चेत असतात. अशातच अभिनेत्री श्रीया रेड्डी सध्या आपल्या अभिनयामुळे नाही तर फॅशनमुळे चर्चेत आली आहे.
अभिनेत्री श्रीया रेड्डीच्या स्टायलिश लूकची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा होत असते.
शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने वेस्टर्न लूक करत स्टायलिश ज्वेलरी परिधान करत सुंदर फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्रीने फोटोंमध्ये गोल्डन रंगाचे वेस्टर्न आऊटफिट परिधान केले आहेत. या लूकवर अभिनेत्री खूपच सुंदर दिसते.
अभिनेत्रीच्या ह्या लूकवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
श्रीया रेड्डीने तमिळ आणि तेलुगू इंडस्ट्रीमध्ये अनेक प्रमुख भूमिका साकारल्या असून तिच्या अभिनयाची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा होते.
भारताचे माजी टेस्ट क्रिकेटर भरत रेड्डीची ती मुलगी आहे. २००२ मध्ये रिलीज झालेल्या 'समुराई' चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये तिने डेब्यू केलं.
श्रीयाने २००८ मध्ये निर्माता विजय कृष्णा रेड्डीसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर तिने अभिनय क्षेत्र सोडलं होतं. पण २०१८ मध्ये तिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केलं.