Siddhi Hande
दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना नेहमी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
रश्मिका मंदाना दाक्षिणात्य चित्रपटासह बॉलिवूड चित्रपटांमध्येही झळकली आहे.
रश्मिकाचा मोठा चाहतावर्ग आहे. ती नेहमी सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो पोस्ट करत असते.
रश्मिकाने नुकतंच कॅज्युअल फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोत तिने तिच्या संपूर्ण केसात गुलाबाची फुळे माळल्याचे दिसत आहे.
रश्मिकाने या फोटोवर हटके कॅप्शनदेखील दिले आहे. खूप बरं वाटत नाहीये तरीही फुलांसोबत असणे हे थांबायचं नाही,असं कॅप्शन तिने दिलं आहे.
रश्मिकाच्या क्युट स्माईलने लाखो तरुणांना वेड लावले आहे.
रश्मिका मंदानाने काही दिवसांपूर्वीच अनंत अंबानी- राधिका मर्चंटच्या लग्नाला हजेरी लावली होती. यावेळी तिने खास लूक केला होता.