Chetan Bodke
भारतीय सिनेसृष्टीमध्ये अभिनेत्री प्रियामणी राज हिने आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांमध्ये प्रसिद्धी मिळवली आहे.
प्रियामणीने बॉलिवूडसह टॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
प्रियामणी लवकरच यामी गौतमी सोबत 'आर्टिकल ३७०' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून नुकतेच प्रमोशन निमित्त अभिनेत्रीने हटके आऊटफिट वेअर केले आहे.
शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये प्रियामणीने फॅन्सी ड्रेस वेअर करीत चाहत्यांचे लक्ष वेधलेय.
अभिनेत्रीने या ड्रेसवर ग्लॉसी मेकअप केला असून मोकळे केस सोडत हटके फॅशन केली आहे.
अभिनेत्रीच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
प्रियामणीने आतापर्यंत मल्याळम, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटामध्ये तिने प्रमुख भूमिका साकारली आहे.
प्रियामणीचा फक्त अभिनयामुळेच नाही तर तिच्या सौंदर्यामुळेही मोठा चाहतावर्ग आहे.