Chetan Bodke
साऊथ फिल्म इंडस्ट्रीतल्या सेलिब्रिटींची फॅन्समध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.
सेलिब्रिटी नेहमी इन्स्टाग्रामवर सक्रिय असतात, इन्स्टाग्रामवर आपले आवडते सेलिब्रिटी एका पोस्टसाठी किती मानधन घेतात? हे तुम्हाला माहित आहे का?
'पुष्पा २' फेम अल्लू अर्जुन भारतीय सिनेसृष्टीतला महागडा सेलिब्रिटी आहे. तो एका प्रमोशनल पोस्टसाठी ७ ते ८ कोटी मानधन घेतो.
'अॅनिमल' स्टारर आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना एका प्रमोशनल पोस्टसाठी २० ते ३० लाख रुपये मानधन घेते.
टॉलिवूडचा हँडसम हंक अभिनेता विजय देवरकोंडा इन्स्टाग्रामवरील एका प्रमोशनल पोस्टसाठी १ ते २ कोटी रुपये मानधन घेतो.
साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू एका प्रमोशनल पोस्टसाठी १५ ते २५ लाख रुपये मानधन घेते.
साऊथ सुपरस्टार महेश बाबू इन्स्टाग्रामवरील एका प्रमोशनल पोस्टसाठी १ ते २ कोटी रुपये मानधन घेतो.
अभिनेत्री काजल अग्रवाल एका प्रमोशनल पोस्टसाठी ५० लाख ते १ कोटी रुपये इतके मानधन आकारते.
बॉलिवूडसह टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडे एका सोशल मीडिया पोस्टसाठी ३० लाख ते ५० लाख रुपये इतके मानधन आकारते.