ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रोटीन आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. प्रोटीनसाठी आपण दूध, चीज, टोफू आणि पनीर यासारख्या पदार्थांचे सेवन करतो.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पनीर की टोफू या दोघांपैकी कोणत्या पदार्थात सर्वात जास्त प्रोटीन असते.
पनीर हे गाय आणि म्हशीच्या शुद्ध दुधापासून बनवले जाते तर टोफू सोयाबीनच्या दुधापासून बनवले जाते.
लोक टोफूला एक आरोग्यदायी पर्याय मानतात कारण त्यात पनीरपेक्षा कमी कॅलरीज असतात. म्हणूनच लोक पनीरऐवजी टोफू खाणे पसंत करतात.
100 ग्रॅम पनीरमध्ये सुमारे 260 कॅलरीज असतात, परंतु टोफूमध्ये 64 कॅलरीज असतात. तर पनीरमध्ये टोफूपेक्षा जास्त प्रोटीन असतात.
टोफूमध्ये पनीरपेक्षा कमी प्रोटीन असते पण वजन कमी करण्यासाठी टोफू सर्वोत्तम आहे.
म्हणून, जर तुम्हाला प्रोटीनचे सेवन वाढवायचे असेल तर पनीर खा आणि जर तुम्हाला कमी कॅलरीज खायचे असेल तर टोफू खा.