ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हायपोक्लेमिया एक अशी स्थिती आहे. ज्यामुळे शरीरात पोटॅशियमची कमतरता निर्माण होते ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढू शकतो.
खराब आहार, औषधांचे जास्त सेवन किंवा जुना आजार यामुळे देखील शरीरात पोटॅशियमची कमतरता निर्माण होऊ शकते.
पोटॅशियमच्या कमतरतेमुळे स्नायू कमकुवत होणे आणि वारंवार थकवा येणे अशी लक्षणे दिसून येतात.
हृदयाचे ठोके अचानक वाढणे हे देखील एक लक्षण असू शकते.
तसेच, वारंवार लघवी होणे, गॅस तयार होणे हे देखील हायपोक्लेमिया किंवा पोटॅशियमची कमतरता दर्शवू शकते.
केळी, बटाटा, दूध, पालक आणि मासे यासारखे पोटॅशियमयुक्त पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करा.
याशिवाय, शरीरात पाण्याची कमतरता भासू नये म्हणून पुरेसे पाणी पित राहा.