Manasvi Choudhary
आज मुंबईतील कोस्टल रोडच्या वरळी ते मरीन ड्राईव्ह मार्ग या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थित हा लोकार्पण सोहळा होईल.
कोस्टल रोड वरळी आणि मरीन ड्राइव्ह यांना जोडणार आहे. यामध्ये दोन भूमिगत बोगदे तयार करण्यात आले आहेत.
१०.५८ किमी लांबीच्या कोस्टल रोडचा काही भाग समुद्राखाली बांधण्यात आला आहे.
कोस्टल रोडवर अवजड वाहने ट्रेलर, ट्रॅक्टर, बाईक, स्कूटर, रिक्षा, तीन चाकी टेम्पो, सायकल या वाहनाच्या प्रवेशास बंदी आहे.
कोस्टल रोड वरळी ते मरीन ड्राइव्ह मार्गिकेवर आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार केवळ पाच दिवस प्रवास करता येईल.
शनिवार व रविवार वाहतूकीस हा रोड पूर्णत: बंद ठेवण्यात येईल.