Todays Horoscope: या राशींना जुन्या गुंतवणुकीतून धनलाभ मिळेल; वाचा राशीभविष्य

Surabhi Jayashree Jagdish

मेष

प्रेमामध्ये आपला उतावळेपणा वाढेल. आपल्या प्रियकराबरोबर बोलताना आज काळजी घ्यावी. काही गोष्टी रागाच्या भरात बोलल्या जातील.

वृषभ

जितके झेपेल तेवढीच कामे करा. आज कामाचा वाढता प्रभाव आपल्यावर राहील. इतरांसाठी नको इतकी धावपळ केली जाईल.

मिथुन

आपली वक्तृत्व कला बहरेल. एखाद्या ठिकाणी मानाचे चांगले आमंत्रण आपल्याला येईल. कार्यक्रमात चांगल्या पद्धतीने आपण आपले योगदान द्याल.

कर्क

आयुष्यात काही येणे जाणे चालू असते. आज धनाशी निगडीत अशा गोष्टी घडतील. अर्थात लक्ष्मी खेळती असावी म्हणजे काय याचा अनुभव आज तुम्हाला येईल.

सिंह

जे काही ठरवाल ते करणारच अशी काहीशी प्रतिज्ञा घेऊन आजचा दिवस आलेला आहे. कोणत्याही कार्यामध्ये न डगमगता पाऊल टाकावे.

कन्या

बौद्धिकतेची कसोटी घेणारा आजचा दिवस आहे. अचानक काही गोष्टींचा भार, कामाचा महापूर असा काहीसा दिवस आज आहे.

तूळ

सून आणि जावई यांच्यापासून चांगली वागणूक आज मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून धनलाभ दिसतो आहे. एकूणच दिवस चांगला आहे.

वृश्चिक

कर्मप्रधानता हेच जमेस धरून आज काम कराल. चांगले वाईट खरे खोटे या पडताळणीच्या बाहेर जाऊन कामे कराल.

धनु

लांबच्या प्रवासाचे योग आहेत.मंदिरामध्ये भेटी, तीर्थक्षेत्रे जाणे, दान, दानत,अध्यात्मक गुरूंची भेट किंवा इतरही भाग्यकारक घटना आज घडतील.

मकर

कितीही कष्ट केले तरी सुद्धा जसे घडणार आहे ते होईलच हे आज जाणवेल. कडी कपारीतून वाट काढत एखादे ध्येय गाठण्याचा इवलासा प्रयत्न असेल.

कुंभ

आपल्यातील सकारात्मक गोष्टी आज कामाच्या ठिकाणी फायद्याच्या ठरतील. जुने अनुभव गाठीशी असतील तर ते आज तुम्हाला काम करण्यास प्रेरित करतील आणि मार्ग दाखवतील.

मीन

पायाचे दुखणे मानसिक ताण त्रास आज आपल्या वाटेला आहेत. विचार करून निर्णय घ्यावेत. अविचाराने कृती नको. सावध राहा.

Cooking Tips No Onion: कोणत्या भाज्यांमध्ये कच्च्या कांद्याची फोडणी देऊ नये? भाजीची चव बिघडेल

येथे क्लिक करा