ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिवाळ्यात ओठांचे ड्राय होणे हे सामान्य आहे. ओठांची स्कीन हे चेहऱ्याच्या स्कीनपेक्षा नाजूक असते. त्यामुळे त्याची विशेष काळजी घेतली पाहिजे.
ड्राय ओठांना सॅाफ्ट करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.
रात्री झोपायच्या अगोदर तूप, दूध किंवा खोबरेल तेलाने मसाज करु शकता ज्याने ओठाची ड्रायनेस कमी होऊन ते सॅाफ्ट होतील.
जर तुमचे ओठ जास्त ड्राय असतील तर दिवसातून २ ते ३ वेळा लिप बाम लावा.
ओठांना एक्सफोलिएट किंवा स्क्रब केल्याने डेड स्कीन निघून जाते. आठवड्यातून २ते ३ वेळा स्क्रब करा.
हिवाळ्यात आपण पाणी कमी पितो ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या होते आणि ओठ ड्राय होतात. त्यामुळे पाणी जास्त प्या जेणेकरुन शरीर हायड्रेट राहील.
हिवाळ्यात ओठांची ड्रायनेस दूर करण्यासाठी केमिकल नसलेले लिप बाम वापरा. केमिकल असलेल्या प्रोडक्टसमुळे ओठ काळे पडू शकतात. तसेच कलरवाले लिप बाम वापरु नका.
हिवाळ्यात शक्यतो मॅट लिपस्टिक लावणे टाळा. यामुळे ओठ ड्राय आणि काळे पडतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: ब्लड प्रेशरने त्रस्त आहात तर करा 'ही' योगासने, तणाव होईल दूर