Vomiting During Travel: प्रवासात उलट्या होतात का? ‘या’ टिप्स वापरून प्रवास करा बिनधास्त

Dhanshri Shintre

ट्रिपचा आनंद

प्रवासाची मजा घेताना अनेकांना उलट्यांची भीती सतावते, ज्यामुळे संपूर्ण ट्रिपचा आनंद खराब होतो.

पाण्याची कमतरता

प्रवासादरम्यान उलट्यांमुळे केवळ फक्त त्रासच होतो असं नाही, तर शरीरात पाण्याची कमतरताही गंभीर समस्या निर्माण करते.

आले आणि लिंब

प्रवासादरम्यान आलेची चॉकलेट किंवा लिंबाचा सुगंध मळमळ कमी करुन मोशन सिकनेसपासून आराम देतो.

कार किंवा बस

कार किंवा बसमधील समोरच्या खिडकीजवळ बसल्याने मोकळी हवा मिळते आणि लक्ष वेगळे राहून मळमळ कमी होते.

तेलकट अन्न टाळा

प्रवासापूर्वी जड, तेलकट अन्न टाळा आणि त्याऐवजी हलके, पचायला सोपे अन्न सेवन करा.

पुदिना किंवा वेलची

उलट्या होत असल्यास पुदिन्याची पाने किंवा वेलची चावल्याने मळमळ कमी होते आणि आराम मिळतो.

आराम करा

लांब प्रवासात डोळे बंद करून थोडा आराम केल्यास मेंदू शांत राहतो आणि उलट्यांची शक्यता कमी होते.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

NEXT:  अमरनाथ यात्रा 2025 साठी नोंदणी कशी करावी? जाणून घ्या आवश्यक स्टेप्स, वेबसाइट

येथे क्लिक करा