Sakshi Sunil Jadhav
ज्वारीचा उपमा किंवा उकडपेंडी थंडीत अत्यंत पौष्टीक मानली जाते. लहान मुलांना ज्वारीची भाकरी कंटाळवाणी वाटते. अशा वेळेस ही रेसिपी उत्तम ठरेल.
ज्वारीचे पीठ १ कप, तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा, पाणी, हळद, मीठ, कोथिंबीर, लिंबाचा रस इ.
सर्वप्रथम कढईमध्ये 1 ते 2 टिस्पून तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि कढीपत्ता टाका.
साहित्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कांदा घालून हलका गुलाबी होईपर्यंत परता.
हळद व चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. हळद जास्त जळणार नाही याची काळजी घ्यावी. तुम्ही ती स्किप सुद्धा करू शकता.
कढईत 2 ते अडीच कप पाणी घालून चांगले उकळून घ्या. त्याने मिश्रण सॉफ्ट होतील.
लाटण्याच्या पीठासारखे नसून सैलसर पीठ घ्या. गाठी होऊ नयेत म्हणून हातात किंवा वाडग्यात मोकळे करून ठेवा. तुम्ही वापरण्यापुर्वी पीठ एकदा भाजून घेऊ शकता.
गॅस कमी करा आणि ज्वारीचे पीठ हळूहळू पाण्यात ढवळत टाका, जेणेकरून गाठी होणार नाहीत.
मिश्रण घट्ट होईपर्यंत सतत ढवळत राहा. सुमारे 3 ते 4 मिनिटे लागतात. झाकण ठेवून साधारण 5 मिनिटे मंद आचेवर वाफवून शिजू द्या.
गॅस बंद करून कोथिंबीर व लिंबू रस घालून सर्व्ह करा. गरमागरम ज्वारीची उकडपेंडी उपमा खायला तयार होईल.