Shreya Maskar
तिरंगा नूडल्स बनवण्यासाठी उकडलेले नूडल्स, किसलेले गाजर, उकडलेले वाटाणे, पालक पेस्ट, कांदा, हिरवी मिरची, तेल, काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ इत्यादी साहित्य लागते.
तिरंगा नूडल्स बनवण्यासाठी सर्वप्रथम उकडलेले नूडल्स तीन भागांत वाटून घ्या.
एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात थोडा कांदा परतून नूडल्सचा एक भाग शिजवून घ्या.
आता नूडल्सचा दुसऱ्या भाग शिजवताना त्यात किसलेले गाजर घाला.
नूडल्सच्या तिसऱ्या भागात वाटाणा आणि पालकची पेस्ट घालून परतून घ्या.
तिन्ही नूडल्सच्या मिश्रणात काळी मिरी पावडर आणि मीठ घालायला विसरू नका.
आता एका पेल्टमध्ये नूडल्सचे तीन लेअर पसरवा.
चटपटीत सॉससोबत गरमागरम नूडल्सचा आस्वाद घ्या.