Tiramisu Recipe: गोड खाण्याची इच्छा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट इटालियन टिरामिसू डेझर्ट; वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

२०० ग्रॅम मस्करपोने चीज, १ कप व्हिपिंग क्रीम, २ चमचे इन्स्टंट कॉफी, अर्धा कप कोमट पाणी, ४ चमचे पिठीसाखर, १५ ते २० लेडीफिंगर बिस्किटे, २ चमचे कोको पावडर , १ चमचा साखर

Tiramisu Recipe

कॉफी तयार करून घ्या

एका भांड्यात अर्धा कप कोमट पाणी घ्या. त्यात २ चमचे इन्स्टंट कॉफी आणि १ चमचा साखर घालून चांगले मिक्स करा. कॉफी थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.

Tiramisu Recipe | Saam Tv

क्रीम तयार करा

एका भांड्यात १ कप थंड व्हिपिंग क्रीम घ्या. त्यात ३ ते ४ चमचे पिठीसाखर घालून क्रीम घट्ट होईपर्यंत फेटून घ्या.

Tiramisu Recipe

मस्करपोने चीज मिक्स करा

दुसऱ्या भांड्यात २०० ग्रॅम मस्करपोने चीज घ्या. त्यात थोडी पिठीसाखर घालून हलक्या हाताने मिक्स करा. आता तयार केलेली व्हिपिंग क्रीम त्यात मिसळा.

Tiramisu Recipe | Saam Tv

बिस्किटे कॉफीमध्ये बुडवा

लेडीफिंगर बिस्किटे घ्या. प्रत्येक बिस्किट कॉफीमध्ये एक-दोन सेकंद बुडवून बाहेर काढा. बिस्किटे जास्त वेळ कॉफीमध्ये ठेवू नका, अन्यथा ती मऊ होऊन तुटू शकतात.

Tiramisu Recipe

पहिला थर तयार करा

एका काचेच्या भांड्यात कॉफीमध्ये भिजवलेली बिस्किटे एकमेकांना लागून ठेवा. त्यावर तयार केलेल्या क्रीमचे मिश्रण पसरवा. चमच्याने हा थर एकसारखा करा.

Tiramisu Recipe

दुसरा थर तयार करा

आता पुन्हा कॉफीमध्ये भिजवलेली बिस्किटे ठेवा. त्यावर उरलेले क्रीम पसरवा. अशा प्रकारे बिस्किटे आणि क्रीमचे दोन थर तयार करा.

Coffee Cheesecake Recipe

कोको पावडर टाकून थंड करा

शेवटी क्रीमच्या थरावर चाळणीच्या मदतीने कोको पावडर भुरभुरवा. तयार टिरामिसू ६ ते ८ तास फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्यावर त्याचे तुकडे करून सर्व्ह करा.

Tiramisu Recipe

Real vs Fake Honey: तुम्ही खात असलेलं मध शुद्ध आहे की भेसळयुक्त? घरच्या घरी करा ही सोपी टेस्ट

Real vs Fake Honey | Saam Tv
येथे क्लिक करा