Manasvi Choudhary
हिवाळ्यात नोव्हेंबर-डिसेंबरच्या महिन्यात सुट्टीत पिकनीकचे प्लान केले जातात.
अनेकजण परिवार, मित्रमंडळीसोबत बाहेर फिरायला जातात तुम्हीदेखील पिकनीकला जाणार असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे आहे.
हिवाळ्यात थंडीमुळे प्रवासादरम्यान पाय आणि शरीराचे सांधे आखडण्याची शक्यता असते. त्याचा नंतर त्रास होऊ शकतो यामुळे गाडी प्रवासादरम्यान थांबल्यास खाली उतरा.
प्रवासात गार पाणी किंवा थंड पदार्थ खाणे टाळा यामुळे घसा दुखू लागतो. तेलकट पदार्थ देखील प्रवासादरम्यान खाणे टाळा.
थंडीमुळे सर्दी- खोकला होण्याची शक्यता असल्याने त्यासाठी आवश्यक असणारी घरगुती औषधे, सर्दीसाठी आराम देणाऱ्या गोळ्या घेऊन ठेवा.
तुम्ही जात असलेल्या ठिकाणाच्या तापमानाची किमान माहिती करुन घ्या आणि त्यानुसार जास्तीचे कपडे सोबत ठेवा. थंडीला पुरतील असे जास्तीचे उबदार कपडे सोबत ठेवा.
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते आणि खाज सुटते. तसेच आगही होते. काहींना खाजवल्यानंतर रक्त येते. त्यामुळे कोल्डक्रिम, तेल, लीपबाम यांसारख्या त्वचेला मऊ ठेवतील अशा गोष्टी सोबत ठेवा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.