Manasvi Choudhary
हिवाळ्यात वातावरण थंड असते यामुळे शरीराला उष्ण वाटणाऱ्या पदार्थाचे सेवन केले जाते.
हिवाळ्यात थंडीच्या दिवसात मेथीचे सेवन केले जाते.. मेथीच्या भाजी विविध प्रकार तुम्ही घरी ट्राय करू शकता.
मेथीची डाळ भाजी ही अत्यंत चविष्ट आहे घरच्या घरी तुम्ही सोप्या पद्धतीने ही रेसिपी करू शकता.
मेथीची डाळ भाजी बनवण्यासाठी सोललेली मेथी, मूग डाळ, लसूण, हिरवी मिरची, कांदा, हळद, मसाला, गूळ, मीठ, तेल हे साहित्य एकत्र करा.
मेथीची डाळ भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये मूग डाळ, हळद आणि थोडे पाणी घालून शिजवून घ्या. गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये लसूण, हिरवी मिरची परतून घ्या.
नंतर या मिश्रणात बारीक चिरलेली मेथी परतून घ्या नंतर यामध्ये हळद, मसाला, चवीनुसार मीठ, गूळ घालून संपूर्ण मिश्रण परतून घ्या.
शिजवलेली डाळ यामध्ये मिक्स करून संपूर्ण मिश्रण एकजीव करा अशाप्रकारे तुमची मेथीची डाळ ही रेसिपी तयार होईल.