Shreya Maskar
तुमचे केस कुरळे असतील आणि तुम्हाला लग्न, समारंभामध्ये स्ट्रेट केसांची हेअर स्टाइल करायची असेल, तर पार्लरला पैसे देण्यापेक्षा घरीच सिंपल पद्धतीने तुम्ही केस स्ट्रेट करू शकता.
खोबरेल तेल, ऑलिव्ह किंवा एरंडेल तेल थोडे कोमट करून ते तुमच्या टाळूवर आणि केसांना व्यवस्थित लावा. रात्रभर तसेच ठेवा आणि सकाळी धुवून टाका. यामुळे तुमचे केस नैसर्गिकरित्या मुलायम आणि सरळ होतील.
अर्धा कप दुधात एक चमचा मध मिसळा आणि ते तुमच्या केसांना व्यवस्थित लावा. ३० मिनिटांनंतर सौम्य शॉम्पूने केस धुवा. यामुळे तुमचे केस रेशमी आणि सरळ होतील.
कोरफडीचा गर आणि नारळाच्या दुधाचे मिश्रण केसांना लावल्याने केस मऊ होतात आणि कुरळेपणा कमी होतो. याचा वापर आठवड्यातून दोनदा करा.
जर तुम्हाला एखाद्या पार्टी किंवा कार्यक्रमासाठी सरळ केस पाहिजे असतील तर हेअर स्ट्रेटनर, ब्रश आणि ब्लो ड्रायरचा वापर करा.
सर्वप्रथम उष्णतेमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी तुमच्या केसांना हीट प्रोटेक्टेंट स्प्रे लावा. तुमचे केस लहान भागांमध्ये विभागा आणि स्ट्रेटनर वापरा.
हेअर स्ट्रेटनरचे तापमान खूप जास्त ठेवू नका, कारण त्यामुळे केस कोरडे होतात. तसेच केस पटकन तुटतात.
किंचित ओलसर केसांवर ब्रशसोबत ब्लो ड्रायर वापरा. यामुळे तुमच्या केसांना नैसर्गिकरित्या सरळ आणि दाट लूक मिळेल.