Dandruff Home Remedy : केस धुवण्यापूर्वी करा 'हे' काम, टाळूला येणार नाही खाज अन् कोंडाही होईल गायब

Shreya Maskar

दही

दही मधील बुरशीविरोधी गुणधर्म मुळापासून कोंडा नाहीसा करण्यास मदत करतात. तसेच कोरड्या आणि निर्जीव केसांना पोषणही मिळते.

Yogurt | yandex

दह्याचा वापर कसा करावा?

टाळूपासून केसांच्या टोकांपर्यंत दही व्यवस्थित लावा. दही केसांवर एक तास तसेच राहू द्या आणि नंतर सौम्य शॉम्पूने धुवा.

How ​​to use yogurt? | yandex

लिंबाचा रस

लिंबातील जीवाणूविरोधी आणि बुरशीविरोधी गुणधर्म टाळू स्वच्छ करण्यास आणि कोंडा कमी करण्यास मदत करतात.टाळूवर ताज्या लिंबाचा रस लावा. १०-१५ मिनिटांनंतर कोमट पाण्याने केस धुवा. त्यानंतर केस कोरडे करा.

Lemon Juice | yandex

कोरफड

कोरफडीमध्ये दाहशामक आणि जीवाणूविरोधी गुणधर्म असतात, जे टाळूला आराम देतात आणि कोंडा कमी करतात.

Aloe Vera | yandex

कोरफडचा वापर कसा करावा?

हातावर ताज्या कोरफडीचा गर घ्या आणि तो टाळूवर व्यवस्थित मालिश करा. ३० मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर सौम्य शॉम्पूने केस धुवा.

wash your hair | yandex

ॲपल सायडर व्हिनेगर

ॲपल सायडर व्हिनेगर टाळूच्या पीएच पातळीचे संतुलन साधून कोंडा कमी करण्यास मदत करते.

Apple Cider Vinegar | yandex

पाणी

ॲपल सायडर व्हिनेगर पाण्यात मिसळा आणि ते तुमच्या टाळूवर लावा. १५ मिनिटांनंतर केस धुवा. व्हिनेगरचा वास काढून टाकण्यासाठी सुगंधीत शॉम्पूने केस धुवा.

Water | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

disclaimer | yandex

NEXT : ना डाय ना मेहंदी, 'या' एका ट्रिकने पांढरे केस झटक्यात होतील काळे

Hair Care | pinterest
येथे क्लिक करा...