ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेक जण स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बरेच उपाय करतात.
घरगुती उपाय, डॉक्टरांनी दिलेला सल्ला आणि उपचार यावर बराच खर्चही करतात.
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अनेक औषधं-गोळ्याही उपलब्ध असतात.
पण अशा अनेक ट्रिक्स आहेत, ज्यांच्यामुळं स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
जिगसॉ कोडे खेळल्यामुळे लहान मुलांमधील एकाग्रता वाढण्यास मदत होते.
कार्ड खेळल्यामुळं विचार करण्याची क्षमता आणि स्मरणशक्तीही वाढते.
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही नवीन शब्द रचना शिकू शकता. त्यामुळं तुमचा शब्दसंग्रह वाढेल.
नवीन नृत्यकला शिकल्याने मेंदूला चालना मिळते. साल्सा, हिप-हॉप आदी प्रकारचं नृत्य करून पाहा.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कोणतीही कृती करण्याआधी तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन घ्यावं.