Eyeliner Tips : 'आयलाइनर'शिवायही तुमचे डोळे सुंदर अन् रेखीव दिसतील; ट्राय करा 'या' सिंपल मेकअप ट्रिक्स

Shreya Maskar

आयलाइनर

अनेक महिलांना आयलाइनर लावायला नीट येत नाही , तसेच काहींना आयलाइनर आवडत नाही, तेव्हा आयलाइनर न लावताही तुम्ही डोळ्यांचे सौंदर्य वाढवू शकता. सोप्या मेकअप टिप्स पाहा.

Eyeliner | yandex

सुंदर डोळे

तुमचे डोळे सुंदर आणि आकर्षक बनवण्यासाठी काजळ वापरा. वॉटरलाइनवर (डोळ्यांच्या आतल्या बाजूला) जाडसर काजळ लावा. त्यानंतर आयशॅडो ब्रशने ते काजळ पसरवा.

Eyeliner | yandex

काजळ

काजळ लावल्याने तुमचे डोळे मोठे आणि अधिक सुंदर दिसतात. जर तुमचे डोळे लहान असतील, तर ही युक्ती तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Kajal | yandex

मस्कारा

डोळे अधिक आकर्षक दिसण्यासाठी मस्कारा लावा. मस्कारामुळे तुमचा लूक जड वाटत नाही, उलट तुमच्या पापण्या अधिक लांब आणि दाट दिसतात, ज्यामुळे तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य वाढते.

Mascara | yandex

आयशॅडो

आयलाइनरशिवाय तुमचे डोळे निस्तेज दिसत असतील, तर हलक्या रंगाचा आयशॅडो वापरा. न्यूट्रल , पीच किंवा हलक्या तपकिरी रंगांचे आयशॅडो नैसर्गिक आणि सुंदर लूक देईल.

Eyeshadow | yandex

आयब्रो पेन्सिल

तपकिरी रंगाची आयब्रो पेन्सिल तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य वाढवेल. आयलाइनरऐवजी तपकिरी रंगाची आयब्रो पेन्सिल लावा आणि नंतर बोटाने हलक्या हाताने पसरवा.

Eyebrow Pencil | yandex

आयलाइनरचे महत्त्व

आयलाइनर हे डोळ्यांचे सौंदर्य वाढवणारे, त्यांना अधिक उठावदार, मोठे दाखवते. आयलाइनरमुळे एक आत्मविश्वास देखील वाढतो. प्रत्येक लूकला परिपूर्ण बनवते.

Eyeliner | yandex

आयलाइनरचे रंग-प्रकार

आयलाइनरमध्ये निळा, हिरवा, तपकिरी, जांभळा आणि पांढरा हे प्रमुख रंग उपलब्ध आहेत. तसेच पेन्सिल, लिक्विड, जेल हे आयलाइनरचे मुख्य प्रकार आहेत.

Eyeliner Colors and Types | yandex

NEXT : Face Pack लावल्यावर त्वचा कोरडी होते? मग मऊ अन् तजेलदार त्वचेसाठी 'हे' पदार्थ फेस पॅकमध्ये मिक्स करायला विसरू नका

Harbal Face Pack | GOOGLE
येथे क्लिक करा...