Manasvi Choudhary
उन्हाळ्याच्या दिवसात भाज्या नीट साठवून ठेवणं महत्वाचे आहे कारण उन्हाळ्यात भाज्या लवकर खराब होतात.
टोमॅटो थंड आणि कोरड्या वातावरणात ठेवल्यास जास्त दिवस ताजे राहतात. खराब टोमॅटो बाजूला न काढल्यास चांगले टोमॅटोसुद्धा खराब होतात.
टोमॅटो खराब होऊ नये म्हणून त्याची देठ काढून टाका, देठ वरच्या बाजूला असल्यास टोमॅटो खराब होत नाही व मऊ पडत नाही.
टोमॅटो अधिक काळ साठवायचे असतील तर धुवून ठेऊ नका. धुतल्यानंतर टोमॅटो मऊ पडतात त्यामुळे ते खराब लवकर होऊ शकतात.
जर टोमॅटो थोडे कच्चे असतील, तर ते कागदात गुंडाळून ठेवा म्हणजे ते व्यवस्थित राहतात आणि जास्ती दिवस टिकतात.
जर तुमच्याकडे फ्रिज नसेल तर तुम्ही कोरड्या जागी लाकडी टोपली किंवा जाळीदार टोपलीत टोमॅटो ठेवू शकता.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.