Shreya Maskar
हिवाळ्यात खास कोकण स्पेशल तिळकूट चटणी बनवा. अगदी ५-१० मिनिटांत पदार्थ तयार होईल. साहित्य, कृती लिहून घ्या.
तिळकूट चटणीबनवण्यासाठी तीळ, सुकं खोबरं, जिरं, लसूण, लाल तिखट आणि मीठ इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात थोडे शेंगदाण्याचा कूट देखील टाकू शकता.
तीळकूट चटणी बनवण्यासाठी पॅन गरम करून त्यात वाटीभर तीळ भाजून घ्या. त्यानंतर त्या भाजलेल्या तिळाचे तिळकूट बनवा.
दुसऱ्या पॅनमध्ये किसलेलं सुकं खोबरं, जिरं, लसूण घालून चांगले भाजून घ्या. खोबरं जास्त करपणार नाही याची काळजी घ्या.
आता भाजलेले तिळकूट आणि सुकं खोबऱ्याचे मिश्रण मिक्सरला चांगले वाटून घ्या आणि बारीक करा.
तयार मिश्रण एका बाऊलमध्ये काढून त्यात लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाका.
गरमागरम भाकरीसोबत तिळकूट चटणीचा आस्वाद घ्या. एक घास खाताच तुम्हाला कोकणाच्या जेवणाची आठवण येईल.
तिळकूट चटणी तुम्ही आठवडाभर स्टोर करून ठेवू शकता. हिवाळ्यात या चटणीचे सेवन करा. हिवाळ्यात तीळ शरीरासाठी चांगले असतात.