Shreya Maskar
भोपळ्याचे आप्पे बनवण्यासाठी भोपळा, रवा, कोबी,शिमला मिरची, कांदा, गाजर, बेसन पीठ, दही, लसूण, आलं, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.
भोपळ्याचे आप्पे बनवण्यासाठी सर्वप्रथम गाजर, कोबी, शिमला मिरची, कांदा सर्व भाज्या बारीक कापून घ्या.
भोपळा स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करा. त्यानंतर बारीक किसून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून कापलेल्या भाज्या परतून घ्या.
एका बाऊलमध्ये बेसन पीठ, रवा, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर चांगले मिक्स करा. तुम्ही यात आवडीचे मसाले देखील टाकू शकता.
आता एका मोठ्या बाऊलमध्ये भोपळ्याचा किस, परतलेल्या भाज्या आणि बेसनाचे मिश्रण एकजीव करून चांगले मिक्स करा.
मिश्रणात चवीनुसार मीठ आणि खाण्याचा सोडा टाकून मिक्स करा. यात तुम्ही थोडं पाणी टाकून घट्ट पेस्ट बनवा.
आप्पे पात्राला तेल लावून त्यात सर्व मिश्रण टाका आणि गोल्डन फ्राय करा. आप्पे जळणार नाही याची काळजी घ्या.
खमंग भोपळ्याचे आप्पे पुदिन्याच्या चटणीसोबत खा. मुलांना हा पदार्थ खूपच आवडेल आणि टिफिन मिनिटांत फस्त होईल.