Shreya Maskar
ऑफिसवरून आल्यावर काही झणझणीत खावेस वाटत असेल तर झटपट काजूची उसळ बनवा. अगदी १०-१५ मिनिटांत रेसिपी तयार होईल.
काजूची उसळ बनवण्यासाठी ओले काजू, खडे मसाले, तेल , आले-लसूण पेस्ट, ओलं खोबरं, कांदा, टोमॅटो, हळद, मीठ, लाल तिखट मसाला, कोथिंबीर, मालवणी मसाला इत्यादी साहित्य लागते.
काजूची उसळ बनवण्यासाठी सर्वप्रथम काजू पाण्यात भिजवून स्वच्छ धुवून सोलून घ्यावेत. म्हणजे काजू कडू लागणार नाहीत.
पॅनमध्ये तेल गरम करून खडे मसाले, आलं-लसूण पेस्ट , ओलं खोबरं घालून सर्व छान परतून घ्या.
खडे मसाल्याचे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरला वाटण वाटून घ्या. तुम्ही यात थोडेसे पाणी देखील टाकू शकता.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा, टोमॅटो, हळद, लाल तिखट मसाला, चवीनुसार मीठ, मालवणी मसाला चांगला परतून घ्या
त्यानंतर वाटलेल्या मसाल्याची पेस्ट यात टाकून मिक्स करा. पुढे काजू देखील टाका आणि एक उकळी काढून घ्या.
५-८ मिनिटे भाजी उकळल्यावर त्यावर कोथिंबीर भुरभुरवा. झणझणीत काजूची उसळ बटर लावलेल्या पावासोबत खा.