Shreya Maskar
सणासुदीला घरी आलेल्या पाहुण्यासाठी घरगुती गोड पदार्थ बनवायचा असेल तर पुरणपोळी आईस्क्रीम उत्तम पर्याय आहे. आताच साहित्य आणि कृती लिहून घेऊयात.
पुरणपोळी आईस्क्रीम बनवण्यासाठी पुरण, दूध, साखर, आईस्क्रीम पावडर, ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात आणखी तुमच्या आवडीनुसार साहित्य टाकू शकता.
पुरणपोळी आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम पुरण बनवून घ्या. यासाठी पुरणपोळीची पारंपरिक रेसिपी फॉलो करा.
एका बाऊलमध्ये पुरण, दूध, साखर आणि आईस्क्रीम पावडर टाकून मिक्स करा. चांगली घट्ट पेस्ट बनवून घ्या.
आता हे मिश्रण फ्रिजमध्ये थंड करायला १-२ तास ठेवून द्या. जेणेकरून आईस्क्रीम चांगला सेट होईल. तसेच त्याची चव देखील वाढेल.
मिश्रण थंड झाल्यावर त्यात कापलेले ड्रायफ्रूट्स टाका. तुम्ही यात काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोडचा समावेश करू शकता.
तुम्ही पुरणपोळी आईस्क्रीममध्ये आमरस देखील टाकू शकता. मात्र आमरस टाकून तुम्हाला पुरणपोळी आईस्क्रीम फक्त उन्हाळ्यात करता येईल.
पुरणपोळी आईस्क्रीम बनवताना पुरणपोळीचे पुरण परफेक्ट बनवणे गरजेचे आहे. नाहीतर आईस्क्रीमची चव बिघडेल.