Shreya Maskar
तिळाची पोळी बनवण्यासाठी तीळ, भाजलेले शेंगदाणे, गूळ, मैदा, सुक किसलेलं खोबरं, जायफळ, तूप आणि वेलची पावडर इत्यादी साहित्य लागते.
तिळाची पोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम तीळ, शेंगदाणे, गूळ, किसलेलं खोबरं, जायफळ आणि वेलची पावडर सर्व एकत्र मिक्सरला वाटून घ्या.
आता मैद्याचे पीठ मळून मऊ लुसलुशीत करा.
मैद्याचे पीठ 1 तास झाकून ठेवा आणि त्यानंतर पोळी लाटा.
लाटलेल्या मैदाच्या पोळीमध्ये तिळाचे मिश्रण भरा.
पोळी छान लाटून तूपात खरपूस भाजून घ्या.
अशाप्रकारे खमंग तिळाची पोळी तयार झाली.
तिळाची पोळी दूध आणि तुपासोबत तुम्ही खाऊ शकता.