Shreya Maskar
करंजीची पारीसाठी मैदा, तूप, मीठ आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.
करंजीचे सारण बनवण्यासाठी पनीर, तीळ, पिठीसाखर, तूप, वेलची पूड, बेदाणे आणि काजू इत्यादी साहित्य लागते.
तिळाची करंजी बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तूप टाकून पनीरचा कीस परतून घ्या.
त्यानंतर मिश्रणात काजू, बेदाणे आणि तीळ भाजून घ्या.
आता या मिश्रणात साखर आणि वेलची पूड घालून सारण नीट मिक्स करून घ्या.
एका बाऊलमध्ये मैदा, तूप, मीठ आणि पाणी मिक्स करून कणिक मळून घ्या.
गोल पुरी लाटून कडांना तूप लावून त्यात सारण घाला आणि करंजी बंद करा.
तयार करंजी तुपात मंद आचेवर खरपूस तळून घ्या.