Shreya Maskar
मिरची पकोडा बनवण्यासाठी हिरवी मिरची, बेसन, तांदळाचे पीठ, उकडलेले बटाटे, तेल, सोडा, लसूण, हळद आणि चवीनुसार मीठ इत्यादी साहित्य लागते.
मिरची पकोडा बनवण्यासाठी सर्वप्रथम लांब मिरच्या स्वच्छ धुवून उभी चिर पाडून घ्यावी.
एका बाऊलमध्ये उकडलेले बटाटे, लसूण आणि इतर मसाले टाकून भाजी बनवून घ्यावी.
तयार भाजी मिरच्यांमध्ये भरावी.
दुसऱ्या बाऊलमध्ये बेसन, तांदळाचे पीठ, हळद आणि मीठ घालून छान पेस्ट करून घ्यावी.
शेवटी पेस्टमध्ये थोडा सोडा टाका.
भरलेली मिरजी बेसनच्या पेस्टमध्ये घोळवून तेलात खरपूस तळून घ्यावी.
तयार झालेला खुसखुशीत मिरची पकोडा सॉस, दही किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.