Shreya Maskar
मॅगी चीज बॉल बनवण्यासाठी मॅगी नूडल्स, मैदा, कॉर्नफ्लोर , पनीर, तेल हळद पावडर आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
कांदा, शिमला मिरची, कोबी आणि हिरवी मिरची इत्यादी भाज्या लागतात.
मॅगी चीज बॉल बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये मैदा, कॉर्नफ्लोर , मॅगी मसाला, मीठ आणि पाणी घालून छान पेस्ट करून घ्या.
आता दुसऱ्या बाऊलमध्ये मॅगी नूडल्स, कांदा, शिमला मिरची कोबी, हिरवी मिरची, मॅगी मसाला हळद, मैदा, कॉर्नफ्लोर आणि चवीनुसार मीठ घालून सर्व चांगले एकजीव करून घ्या.
आता या मिश्रणाचे गोळे करून त्यात चीजचा तुकडा आणि किसलेले पनीर घालून गोल बंद करून घ्या.
आता हे मॅगी चीज बॉल कॉर्नफ्लोरच्या पिठात घोळवून गोल्डन फ्राय तळून घ्या.
तयार झालेले मॅगी चीज बॉल तुम्ही सॉससोबत सर्व्ह करू शकता.
संध्याकाळी गरमागरम चहासोबत मॅगी चीज बॉल्सचा आस्वाद घ्या.