Shreya Maskar
कोकम सरबत बनवण्यासाठी कोकम, जिरे पावडर, पुदिना, गूळ , काळे मीठ, पाणी आणि बर्फाचे तुकडे इत्यादी साहित्य लागते.
कोकम सरबत बनवण्यासाठी कोरडे कोकम रात्रभर कोमट पाण्यात भिजत ठेवा.
सकाळी कोकम चांगले मॅश करून घ्या.
आता पॅनमध्ये जिरे भाजून घ्या.
एका मोठ्या गॅसमध्ये मॅश कोकम, पुदिन्याची पाने, पाणी, जिरे पूड, काळे मीठ आणि थोडा किसलेला गूळ घालून सरबत छान ढवळून घ्या.
हे सरबत थोडे थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा.
सरबत सर्व्ह करताना एका ग्लासमध्ये सरबत टाकून त्यावर पुदिन्याची पाने आणि बर्फाचे तुकडे टाका.
तुम्ही हे सरबत ४-५ दिवस पिऊ शकता.