Siddhi Hande
पुढच्या आठवड्यात १४ जानेवारीला मकरसंक्रांत आहे. मकरसंक्रात हा मराठी सणांपैकी एक महत्त्वाचा सण आहे.
मकरसंक्रांत हा नवीन वर्षातील पहिला सण असतो. या सणाला खास गोडाचे पदार्थ वाटले जातात. त्याला तिळगूळ, तिळाचे लाडू आणि तिळाच्या चिक्कीला विशेष महत्त्व असते.
तिळाचे लाडू बनवण्याची रेसिपी सर्वांनाच माहित असते. परंतु अनेकांना हे लाडू चावता येत नाही. त्यामुळे तुम्ही तिळाची चिक्की बनवून बघा.
तीळ, तूप, गूळ, वेलची पावडर, किसलेलं खोबरं, काजू-बदाम
सर्वात आधी कढईत १-२ चमचे तूप टाकून तीळ भाजून घ्या. त्यानंतर खोबरेदेखील थोडे भाजून घ्या.
एका बाजूला तीळ थंड होण्यासाठी ठेवून द्या. यानंतर तुम्हाला जर काजू-बदाम हवे असतील तर ते तूपात भाजून घ्या.
यानंतर एका कढईत ५-७ चमचे तूप घाला. त्यानंतर त्यात गूळ टाकून वितळवून घ्या. चिक्की बनवताना चिक्कीचा गूळ वापरावा.
यानंतर तुम्हाला या गुळात भाजलेले तीळ, वेलची पूड, खोबरं, ड्रायफ्रुट्स टाकून काही वेळ ढवळून घ्याचे आहे.
यानंतर एका प्लेटला तेल किंवा तूप लावा. त्यावर ह मिश्रण काढा आणि थापून घ्या.
यानंतर मिश्रण गरम असेपर्यंतच त्याची चिक्की पाडून घ्या. मिश्रण थंड झाल्यानंतर चिक्की तोडून तुम्ही खाऊ शकतात.