Shreya Maskar
मकरसंक्रांती काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.
तिळाचे लाडू बनवण्यासाठी खवा, तीळ, पिठी साखर, ड्रायफ्रूट्स, वेलची आणि तूप इत्यादी साहित्य लागते.
तिळाचे लाडू बनवण्यासाठी पॅनमध्ये तीळ हलके परतून घ्या.
आता दुसऱ्या पॅनमध्ये खवा गोल्डन होईपर्यंत परतून घ्या.
खवा वितळल्यावर त्यात तूप घालून छान परतून घ्या.
परतलेले तीळ मिक्सरला वाटून घ्या.
आता एका बाऊलमध्ये खवा, तीळ, साखर, वेलची आणि तुमच्या आवडीचे बारीक केलेले ड्रायफ्रूट्स घालून लाडू वळून घ्या.
मकरसंक्रांतीसाठी झटपट तिळाचे लाडू तयार झाले.