Siddhi Hande
तीळ पोळी हा पदार्थ महाराष्ट्राच्या घराघरात बनवला जातो. विशेषतः थंडीत मकर संक्रांतीच्या वेळी हा गोडा पदार्थ बनवला जातो.
तीळ पोळी ही शरीरासाठी खूप फायदेशीर असते. ही पोळी बनवण्याची रेसिपीदेखील खूप सोपी आहे.
गव्हाचे पीठ, मैदा, बेसन, तेल, मीठ, पाणी, पांढरे तीळ, गूळ, शेंगदाण्याचा कूट, वेलची पूड, जायफळ, तूप
सर्वात आधी तुम्हाला एका भांड्यात गव्हाचे पीठ घ्यायचे आहे. त्यात बेसन आणि थोडं तेल टाका. यानंतर पाणी टाकून पुरीपेक्षा थोडे मऊ पीठ मळून घ्या.
यानंतर कढईत एक चमचा तूप टाका. त्यात बेसन हलके भाजून घ्या. त्यात तीळ आणि शेंगदाण्याचा कूट मिसळा.
हे मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात किसलेला गूळ, वेलची, जायफळ पूड टाकून मिक्स करा.
यानंतर पीठाचे बारीक गोळे करुन घ्या. त्यात हे सारण भरा.
ही पोळी हलक्या हाताने लाटून घ्या. त्यानंतर तव्यावर दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावून भाजून घ्या.