Chikoo Benefits: वजन कमी ते नॅचरल ग्लो; दिवसभरात एक चिकू खाल्याने मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Shruti Vilas Kadam

पचनक्रिया सुधारते

चिकूमध्ये भरपूर फायबर असतं. त्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅसचा त्रास कमी होण्यास मदत होते. पोट साफ राहण्यासाठी चीकू उपयुक्त मानलं जातं.

Chikoo | GOOGLE

शरीराला एनर्जी मिळते

चिकूमध्ये नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेट्स असतात. त्यामुळे थकवा कमी होतो आणि शरीराला झटपट एनर्जी मिळते. व्यायामानंतरही चिकू खाणं फायदेशीर ठरतं.

Chikoo

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्समुळे शरीराची इम्युनिटी मजबूत होते. त्यामुळे संसर्ग आणि आजारांपासून संरक्षण मिळण्यास मदत होते.

Chikoo pieces

त्वचेसाठी फायदेशीर

चिकूमधील अँटिऑक्सिडंट्स त्वचेचं वृद्धत्व कमी करण्यास मदत करतात. त्वचा मऊ, चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी चीकू उपयुक्त आहे.

chikoo nutrition

हाडे मजबूत होतात

चिकूमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि आयर्नसारखी पोषक तत्त्वे असतात. त्यामुळे हाडांना बळकटी मिळते आणि शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

Chikoo | freepik

तणाव कमी करण्यास मदत

चिकू नैसर्गिक शांततादायक फळ मानलं जातं. हे मेंदूला रिलॅक्स करण्यास मदत करतं आणि तणाव किंवा मानसिक थकवा कमी करण्यास उपयोगी ठरतं.

Chikoo | pinterest

वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत

मर्यादित प्रमाणात चिकू खाल्ल्यास पोट जास्त वेळ भरलेलं वाटतं. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळू शकते.

Chikoo | pinterest

Yoga Benefits: जिमशिवाय फिट राहायचं? रोज करा फक्त हा योग प्रकार

Yoga Benefits | Saam tv
येथे क्लिक करा