Yoga Benefits: जिमशिवाय फिट राहायचं? रोज करा फक्त हा योग प्रकार

Shruti Vilas Kadam

चंद्रनमस्कार म्हणजे काय?

चंद्रनमस्कार हा सूर्यनमस्कारासारखाच योग प्रकार आहे, पण तो अधिक शांत आणि रिलॅक्सिंग मानला जातो. शरीर आणि मनाला संतुलित ठेवण्यासाठी हा योग उपयुक्त ठरतो.

Yoga Benefits | Saam Tv

चंद्रनमस्कार कसा करावा?

ताडासनातून सुरुवात करून हात वर उचला, पुढे वाका, लंज पोझमध्ये जा आणि विविध योगासनांच्या मदतीने हळूहळू मूळ स्थितीत या. श्वसनावर लक्ष केंद्रित ठेवणं महत्त्वाचं असतं.

Yoga Benefits | pinterest

मानसिक तणाव कमी होण्यास मदत

चंद्रनमस्कारामुळे मन शांत राहण्यास मदत मिळते. तणाव, चिंता आणि मानसिक थकवा कमी करण्यासाठी हा योग फायदेशीर मानला जातो.

10 Minute Yoga Benefits | pinterest

झोप सुधारण्यास उपयुक्त

रात्री झोपण्यापूर्वी चंद्रनमस्कार केल्यास शरीर रिलॅक्स होतं आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत मिळू शकते.

10 Minute Yoga Benefits | pinterest

शरीराची लवचिकता वाढते

या योगातील विविध स्ट्रेचिंग पोझमुळे हात, पाय, पाठ आणि कंबर अधिक लवचिक बनण्यास मदत होते. शरीरातील ताणही कमी होतो.

Yoga | pinterest

महिलांसाठी विशेष फायदेशीर

चंद्रनमस्कार हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करू शकतो. मासिक पाळीदरम्यान होणारा ताण आणि अस्वस्थता कमी करण्यासाठीही तो उपयुक्त मानला जातो.

Yoga

सराव करताना घ्या ही काळजी

चंद्रनमस्कार शांत वातावरणात आणि संथ गतीने करावा. सुरुवातीला तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सराव केल्यास योग्य पोश्चर राखणे सोपे जाते.

Yoga Benefits

Face Care: पिंप्लस, डाग आणि टॅनिंग कमी करायची आहे? मग हा घरी तयार केलेला कुलिंग फेसपॅक करा ट्राय

Face Care | Saam Tv
येथे क्लिक करा