Face Care: पिंप्लस, डाग आणि टॅनिंग कमी करायची आहे? मग हा घरी तयार केलेला कुलिंग फेसपॅक करा ट्राय

Shruti Vilas Kadam

फेस पॅक कसा तयार करावा?

एका वाटीत २ चमचे चंदन पावडर घ्या. त्यात आवश्यकतेनुसार तांदळाचं पाणी मिसळून स्मूद पेस्ट तयार करा. हवे असल्यास गुलाबपाणीही घालू शकता.

Face Care | Saam Tv

त्वचेला मिळतो नैसर्गिक ग्लो

तांदळाच्या पाण्यातील व्हिटॅमिन्स आणि चंदनातील थंडावा त्वचेला नैसर्गिक चमक देण्यास मदत करतात. नियमित वापरामुळे चेहरा तजेलदार दिसू लागतो.

Face Care | Saam Tv

पिंपल्स आणि डाग कमी होण्यास मदत

चंदन पावडरमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, तर तांदळाचं पाणी त्वचेची स्वच्छता राखतं. त्यामुळे पिंपल्स आणि त्यांचे डाग कमी होण्यास मदत मिळते.

Face Care | Saam Tv

टॅनिंग दूर करण्यासाठी उपयुक्त

उन्हामुळे काळवंडलेली त्वचा उजळवण्यासाठी हा फेस पॅक फायदेशीर ठरू शकतो. त्वचेवरील टॅनिंग कमी करून त्वचा फ्रेश दिसते.

Face Care | Saam Tv

लावण्याची योग्य पद्धत

तयार पेस्ट चेहरा आणि मानेवर समान प्रमाणात लावा. १५ ते २० मिनिटे सुकू द्या आणि नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

Face Care | Saam tv

ऑइली स्किनसाठी विशेष फायदेशीर

हा उपाय विशेषतः तेलकट त्वचेसाठी उपयुक्त मानला जातो. अतिरिक्त तेल कमी करून त्वचा फ्रेश आणि स्वच्छ ठेवण्यास मदत मिळते.

Face Care | Saam Tv

वापरताना घ्या ही काळजी

संवेदनशील त्वचा असल्यास आधी पॅच टेस्ट करा. आठवड्यातून २ वेळा हा फेस पॅक वापरल्यास चांगले परिणाम दिसू शकतात.

Face Care | Saam Tv

Malai Kofta Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल स्वादिष्ट मलाई कोफ्ता, वाचा सोपी रेसिपी

Malai Kofta Recipe | Google
येथे क्लिक करा