Til Chikki Recipe : हिवाळ्यात खा घरच्या घरी बनवलेली कुरकुरीत तिळाची चिक्की, कमी साहित्यात झटपट रेसिपी तयार

Shreya Maskar

हिवाळा

हिवाळा सुरू झाला की बाजारात तिळाचे लाडू, तिळगूळ आणि चिक्की असे पदार्थ खायला मिळतात. थंडीच्या दिवसांत तिळाची चिक्की खाण्याची मजाच वेगळी असते. तिळातून शरीराला ऊर्जा आणि काही महत्त्वाचे पोषक घटकही मिळतात.

winter | pinterest

तिळाची चिक्की

तिळाची चिक्की बनवण्यासाठी पांढरे तीळ, गूळ, तूप, वेलची पूड आणि मीठ इत्यादी साहित्य लागते. याचे योग्य प्रमाण घ्यावे, जे तुमच्या चिक्कीच्या प्रमाणावर अवलंबून असेल.

Til Chikki | pinterest

तीळ

तिळाची चिक्की बनवण्यासाठी सर्वप्रथम कढई गरम करून त्यात तीळ मंद आचेवर भाजून घ्या. तीळ हलके फुलले आणि त्यांचा खमंग सुगंध आला की गॅस बंद करा. तीळ जास्त भाजू नका.

Sesame seeds | pinterest

गूळ

दुसऱ्या कढईत तूप आणि गूळ घालून मंद आचेवर वितळवून घ्या. गूळ पूर्ण वितळल्यानंतर पाक थोडा घट्ट होऊ द्या.

jaggery | pinterest

तूप

एका वाटीत थंड पाणी घ्या. त्यात पाकाचा एक थेंब टाका. तो लगेच कडक होऊन तुटू लागला, तर पाक तयार झाला आहे. चिक्की कुरकुरीत होण्यासाठी ही पायरी महत्त्वाची आहे.

ghee | pinterest

वेलची पूड

तयार पाकात भाजलेले तीळ आणि वेलची पूड घालून पटकन एकत्र करा. तूप लावलेल्या ताटावर किंवा बटर पेपरवर हे मिश्रण ओता. लाटण्याला थोडे तूप लावून मिश्रण पातळ थापा.

Cardamom powder | pinterest

चिक्कीचा आकार

मिश्रण थोडे गरम असतानाच सुरीने चौकोनी किंवा आयताकृती आकारात कापून घ्या. पूर्ण थंड झाल्यावर चिक्कीचे तुकडे वेगळे करा. अशाप्रकारे तिळाची चिक्की तयार झाली.

Chikki size | pinterest

टीप

तीळ नेहमी मंद आचेवर भाजा. गुळाचा पाक योग्य घट्टपणाचा असणे आवश्यक आहे. चिक्की थापताना मिश्रण पूर्ण थंड होण्याची वाट पाहू नका.चिक्की पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवा.

Note | pinterest

NEXT : थंडीत जेवणाची रंगत वाढवेल कोकण स्पेशल तिळाची चटणी, गरमागरम भाकरीसोबत खाण्याची मजा काही औरच

Konkani Tilachi Chutney Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...