Konkani Tilachi Chutney Recipe : थंडीत जेवणाची रंगत वाढवेल कोकण स्पेशल तिळाची चटणी, गरमागरम भाकरीसोबत खाण्याची मजा काही औरच

Shreya Maskar

हिवाळा

हिवाळा सुरू झाला की घराघरांत पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ बनवण्याची लगबग सुरू होते. कोकणातील खाद्यसंस्कृतीमध्ये तिळाला विशेष महत्त्व आहे. कोकणी पद्धतीची तिळाची चटणी कशी बनवावी, जाणून घेऊयात.

winter | pinterest

कोकण - तिळाची चटणी

कोकण स्पेशल तिळाची चटणी बनवण्यासाठी पांढरे तीळ, लसूण, सुक्या लाल मिरच्या, सुक्या खोबऱ्याचा कीस, जिरे, मीठ, चिंचेचा कोळ आणि गूळ इत्यादी साहित्य लागते.

Konkan - Sesame Chutney | pinterest

पांढरे तीळ

तिळाची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम कढई गरम करून त्यामध्ये पांढरे तीळ घाला. मंद आचेवर तीळ हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. तीळ भाजताना सतत हलवत राहा. ते जळणार नाहीत याची काळजी घ्या.

White sesame | pinterest

सुक्या खोबरं

भाजलेले तीळ एका ताटात काढून थंड होण्यासाठी ठेवा. त्याच कढईमध्ये सुक्या खोबऱ्याचा कीस घालून हलका सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर लसूण पाकळ्या, सुकी लाल मिरची आणि जिरे हलके भाजून घ्या.

Dry coconut | yandex

लसूण

भाजलेले तीळ, खोबरे, लसूण, मिरची आणि जिरे मिक्सरच्या भांड्यात घाला. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि आवडीनुसार थोडा गूळ किंवा चिंचेचा कोळ घाला.

Garlic | pinterest

सुक्या लाल मिरच्या

सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून जाडसर वाटून घ्या. चटणी शक्यतो कोरडीच वाटावी. त्यामुळे तिची चव आणि पोत छान राहतो.

Dry red chillies | pinterest

चिंचेचा कोळ

तयार झालेली चटणी एका स्वच्छ कोरड्या बरणीत काढा. गरमागरम भाकरी, भात किंवा पोळीसोबत सर्व्ह करा.

Tamarind pulp | pinterest

टीप

तीळ मंद आचेवर भाजा. जास्त भाजल्यास चटणी कडवट लागू शकते. चटणीमध्ये थोडासा गूळ घातल्यास तिखट आणि गोडसर चव यांचा छान समतोल साधला जातो.

Note | pinterest

NEXT : मसाला भरल्या भेंडीची चव होईल दुप्पट! भाजीत शेवटी टाका चमचाभर 'हा' खास पदार्थ

Bharli Bhendi Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...