Bharli Bhendi Recipe : मसाला भरल्या भेंडीची चव होईल दुप्पट! भाजीत शेवटी टाका चमचाभर 'हा' खास पदार्थ

Shreya Maskar

मसाला भरलेली भेंडी

भेंडीची भाजी खायला आवडत असेल तर भरली भेंडी नक्की ट्राय करा. पोळी, भाकरी, वरण-भातासोबत ही भाजी अतिशय चविष्ट लागते.

Spiced Okra | pinterest

भरलेली भेंडी साहित्य

भरली भेंडी बनवण्यासाठी भेंडी, शेंगदाण्याचा कूट, सुके खोबरे, तीळ, लाल तिखट, हळद, धणे-जिरे पूड, गरम मसाला, गोडा मसाला, लिंबाचा रस, मीठ, तेल आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.

Ingredients | pinterest

भेंडी

सर्वप्रथम भेंडी स्वच्छ धुऊन पूर्णपणे कोरडी करा. तिचा देठ कापून प्रत्येक भेंडीला मधोमध उभी चीर द्या. भेंडीचे दोन तुकडे होणार नाहीत याची काळजी घ्या.

Okra | pinterest

शेंगदाण्याचा कूट

एका भांड्यात शेंगदाण्याचा कूट, भाजलेले सुके खोबरे, तीळ, लाल तिखट, हळद, धणे-जिरे पूड, गरम मसाला, गोडा मसाला, मीठ आणि लिंबाचा रस एकत्र करा. थोडे तेल घालून मसाला छान मिक्स करा.

Peanut butter | pinterest

भाजलेले सुके खोबरे

तयार केलेला मसाला प्रत्येक भेंडीच्या चिरलेल्या भागामध्ये हलक्या हाताने भरा. उरलेला मसाला बाजूला ठेवा.

Roasted dry coconuts | pinterest

भेंडी फ्राय करा

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मसाला भरलेली भेंडी व्यवस्थित फ्राय करा. मंद आचेवर झाकण ठेवून ८ ते १० मिनिटे शिजवा. मध्ये एकदा हलक्या हाताने भेंडी फिरवा. उरलेला मसाला आणि थोडे पाणी घालून पुन्हा शिजवा.

Fry okra | pinterest

गरमागरम सर्व्ह करा

भेंडी मऊ आणि मसाला छान शिजल्यानंतर त्यावर कोथिंबीर घाला. तुमची चविष्ट भरली भेंडी तयार आहे.

Bharli Bhendi | pinterest

टीप

भेंडी धुतल्यानंतर ती पूर्णपणे कोरडी करा. मसाला भरताना भेंडी तुटणार नाही याची काळजी घ्या. भाजी नेहमी मंद आचेवर शिजवा. भेंडी शिजवताना वारंवार चमच्याने ढवळू नका.

masala Bharli Bhendi | pinterest

NEXT : शंकरपाळी फुलत नाही? मग पीठ मळताना वापरा 'ही' एक ट्रिक, होईल खारीसारखा खुसखुशीत

Shankarpali Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...