Manasvi Choudhary
हिंदू धर्मात टिकली लावण्याला विशेष महत्व आहे. महिलांच्या सोळा श्रृंगारापैकी एक म्हणजे टिकली अत्यंत पवित्र मानली जाते.
टिकली केवळ चेहऱ्याचे सौंदर्य खुलवत नाही, तर ती सुवासिनींच्या सौभाग्याचे आणि सांस्कृतीचे प्रतीक आहे.
सध्याच्या फॅशन जगतात पारंपरिक डिझाईन्ससोबतच अनेक मॉर्डन टिकली प्रकार लोकप्रिय आहेत ते तुम्ही नक्की ट्राय करा.
मराठमोळ्या लूकसाठी साडीवर तुम्ही अर्धचंद्राकृती टिकली लावू शकता जी खुप सुंदर दिसत आहे.
अनेक तरूण मुली ड्रेसवर हटके स्टाईलमध्ये टिकली डिझाईन करा.
लाल टिकली हा पारंपारिक प्रकार आहे. प्रत्येक लूकवर लाल टिकली उठून दिसते. लाल रंगाची टिकली शुभतेचे प्रतीक मानले जाते.
चंद्रकोर टिकली हा प्रकार फार पूर्वीपासून लावला जातो. खास नऊवारी साडीवर या टिकल्याची स्टाईल केली जाते.
लग्नात घागरा, लेहेंग्यावर तुम्ही खड्यांची टिकली लावू शकता. विविध रंगामध्ये खड्यांची टिकली अधिक उठून दिसते.