ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
थायरॉईड ही आपल्या मानेच्या भागात स्थित एक ग्रंथी आहे.
ही ग्रंथी फुलपाखरासारखी आकाराची आहे आणि ती शरीरातील मेटाबॉलिजम नियंत्रित करते.
थायरॉईडचे दोन प्रकार आहेत एक हायपोथायरॉईडीझम आणि दुसरे हायपरथायरॉईडीझम.
हायपोथायरॉईडीझममध्ये शरीरात थायरॉईड हार्मोन्सची कमतरता निर्माण होते. ज्यामुळे थकवा येतो आणि वजन वाढते.
हायपरथायरॉईडीझममध्ये, हार्मोन्सचे प्रमाण वाढू लागते ज्यामुळे वजन कमी होणे, घाबरणे अशा समस्या उद्भवतात.
महिलांमध्ये थायरॉईडच्या समस्या अधिक प्रमाणात आढळतात. ताणतणाव आणि चुकीच्या जीवनशैलीचा देखील थायरॉईडवर परिणाम होतो.
गर्भधारणेदरम्यान थायरॉईडची तपासणी करणे खूप महत्वाचे आहे कारण त्याचा बाळावर परिणाम होऊ शकतो. ब्लड टेस्टद्वारे तुम्ही थायरॉईडची स्थिती माहिती करुन घेऊ शकता.